मला लिहायचय ,
मला लिहायचय ,
मला लिहायचय ,
माहीत नाही कधी? काय? कोठे? कसे? पण मला लिहायचय, खूप दिवसाचे साचलेले-सापडलेले-शोधलेले-माझ्यात अंकुरलेले शब्द मला समोर आणायचेत म्हणून मला लिहायचेय. आज हिम्मत करून जे विषय उच्चरायला माझी जिव्हा हि थरथरायची असे विषय-अश्या घटना मी लिहतोय-प्रयत्न करतोय........ विनाकारण काळजी सोडून अश्या निर्णयांवर लिहतोय जे निर्णय माझे मलाच दुःखांचा डोंगर देऊन तर गेले पण माझ्या दृष्टी कोनातून ते बरोबर होते.....अश्या गोष्टी लिहाच्यात ज्या मी कधीच बोलू शकलो नाही, पण हिम्मत होत नव्हती.
माझ्या गुरूंनी मला सांगितले कि तू लेखणी आणि कागद घेऊन बस शब्द हे त्या हवेतल्या OxYGeN सारखे सैरावैरा फिरत असतात-स्वछंदी मोकळे.....ते अलगद जवळ येतील तुला आपलंस करतील तुला कळणार हि नाही........आणि मी तेच केल त्याच वेळेस मला माझ्यातला आनंद भेटला......सुरवात महत्वाची ठरली......मग उशिरा का होईना......यात सातत्य ठेवायचंय....... कधी कधी वाटते एक खोटारडा काय लिहू शकेल म्हणून मला माझ्यावरच मात करायचीय........
व.पु च्या लेखणीने मी पहिलेच खूप भारावून गेलो होतो त्यात त्यांचा अजून एक लेख वाचला असे लिहले होते कि ५२ पुस्तकांची मेजवानी देऊनही जर त्यांची भूक अजून भागलेलीच नसेल तर त्या मानवाचे विचार किती आफट असतील....खरेच!!!!
मला ह्या सगळ्याचा आस्वाद घ्यायचाय........मला माझ्या आयुष्य पानावर रेखाटायचेय.........अश्या गोष्टी लिहायच्यात ज्यातून उत्साहाचा उस्फुर्त प्रवाह मलाच काय तर कोणालाही उस्फुर्त करेल.........म्हणून मला लिहायचंय........!!!!!
तुम्ही कधीच ठरवू शकत नाहीत कि कोणती जागा, कोणती व्यक्ती, कोणता क्षण,कोणती वेळ तुम्हाला लिहण्यास प्रेरित करेल.......पण हा त्या लिखाणातून-तुमच्या शब्दातून तुमच्या मधले वादळ समोरच्याच्या मनात पोहोचवता आले पाहिजे........यातच लेखकाची खरी कसोटी लागते. असे म्हणतात आयुष्याची कितीही पानं तुम्ही लिहिलीत पण जेव्हा नव कोरं पानं समोर येत तेव्हा डोक्याला मुंग्या येणं साहजिकच, या वादळातून जो पार होतो त्याला प्रथम स्वतःची आणि नंतर त्या परमात्म्याची जाणीव झाल्या बगेर राहत नाही, स्वतः मधून स्वतः मध्ये जाण्याच्या या प्रवासात तुम्हाला टोमणे मारणारे हि तितकेच गरजेचं जितके तुमचे आप्तेष्ट कारण निखळ-अविरत-निस्वार्थ प्रेम करणारी "ती", उगाच पाय ओढणारे आणि अंधारात हि आपल्या नकळत सावली बनून वावरणारे आपले "मित्र" आणि आपले चुकलेलं आहे हे माहित असून सुद्धा विश्वास ठेवणारे आपले "घरचे" हे सगळे सोडून जे आपला चांगला/वाईट विचार करत असतात-तसेच अनुभव देऊन जातात. त्यांनाही कळत नाही ह्या अनुभवातूनच तेही आपल्याला नवी उर्मी देऊन जात आहेत.......
त्या उर्मी मुळेच मला लिहायचंय !!!!!