Friday, February 2, 2018

शब्द हरवतात जेव्हा.....

बोलक्या टपोऱ्या नयनात
             सागर उसळतो जेव्हा.....
तुझ्या निखळ हास्यात
              माझे शब्द हरवतात तेव्हा......

आठवांच्या गर्द धुक्यात
              मी तुझ्या सवे चालतो जेव्हा.....
तुझ्या मृदू काळजाचा
              मज भास होतो तेव्हा.....

इवली बट वेडी,
              तुझ्या भाळी दूडदूडते जेव्हा.....
रुसला-फुगल्या गालांवर-
              माझे मन विरघळते तेव्हा.....

अनोळखी तू ......
                पण ओळखीची खळी पडते जेव्हा.....
नजर जराशी चोरून
               तू लाजते जेव्हा.....
मी पुन्हा नव्याने प्रेमात पडतो अन
               माझे शब्द हरवतात तेव्हा.....

1 comment:

शब्द हरवतात जेव्हा.....

बोलक्या टपोऱ्या नयनात              सागर उसळतो जेव्हा..... तुझ्या निखळ हास्यात               माझे शब्द हरवतात तेव्हा...... आठवांच्या गर...